Join us

5194_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 14:57 IST

सकाळी जेव्हा आपण भाजीमंडईत जातो आणि त्यावेळी एखादी भाजी आपल्याला महागात पडली तर आपण खूप चिडचिड करतो. त्या पालेभाज्यांची गुणवत्ता आपणाला पाहता येत नसते. ज्यावेळी आपण एखादे फळ हातात घेतो, त्यावेळी ताज्या फळाची चव कशी असते हे आपणास माहिती होते. जर तुम्ही देशात कुठे फिरणार असाल आणि तुम्हाला स्वत:च्या हाताने तोडून फळ चाखायचे असेल तर यासाठी काही स्थळांची तुम्हाला माहिती देत आहोत.

सकाळी जेव्हा आपण भाजीमंडईत जातो आणि त्यावेळी एखादी भाजी आपल्याला महागात पडली तर आपण खूप चिडचिड करतो. त्या पालेभाज्यांची गुणवत्ता आपणाला पाहता येत नसते. ज्यावेळी आपण एखादे फळ हातात घेतो, त्यावेळी ताज्या फळाची चव कशी असते हे आपणास माहिती होते. जर तुम्ही देशात कुठे फिरणार असाल आणि तुम्हाला स्वत:च्या हाताने तोडून फळ चाखायचे असेल तर यासाठी काही स्थळांची तुम्हाला माहिती देत आहोत.नाशिक, सातारा, बीड, लातूर, सोलापूर या भागात खूप द्राक्षमळे आहेत. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षे पिकवितात. नाशिकच्या सुला वाईन्समध्ये तुम्ही वाईन तयार करण्याची पद्धत, द्राक्षे तुडविली कशी जातात आणि डिनरच्यावेळी वाईन कशी तयार होते, याची सगळी माहिती घेऊ शकता. जानेवारी ते मे या दरम्यान जाण्यासाठी योग्य वेळ आहे. मान्सूनमध्ये पेरुही तुम्हाला खायला मिळतील.अमृतसरमधील खालसा कृषी महाविद्यालयात नवीन वाण मिळते, त्याला आलुबुखारा अमृतसरी असे म्हणतात. जे अत्यंत चविष्ट असते, त्याशिवाय पौष्टिक आणि बियाही नसतात. जावा आणि जपानमधील मनुकेही या ठिकाणी मिळतात. जून ते जुलै या काळात जांभळे दिसून येतात. हवेलीच्या हिरव्यागार शेतीत याची पैदास केली जाते.किन्नौर, कोटगढ आणि रोहरु या हिमालयीन भागात सफरचंदाची लागवड केली जाते. बाहेरुन आलेल्या पर्यटकांसाठी जाम फॅक्टरीजना भेट देणे हा एक प्रमुख कार्यक्रम आहे. द अ‍ॅपल आॅचर्ड इन आणि द बंजारा आॅर्चर्ड रिट्रीट या ठिकाणी पर्यटकांना नव्या जातीची सफरचंद चाखायला मिळतात.जर खूप सुंदर चव अगदी सकाळी अनुभवयाची असेल तर तुम्हाला संत्रे खाण्यासाठी पंजाबमध्ये जावे लागेल. होशियारपूर मध्ये संत्र्याची खूप मोठी शेती आहे. (जालंधरजवळ). अगदी ७५ एकरांचे अलिशान फार्म हाऊस तुम्हाला पहावयास मिळतील.उन्हाळ्यात कोकण पट्ट्यातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णभूमीचा तुम्हाला अनुभव येईल. हापूस आंब्याचे हे माहेरघर आहे. सरकारी आणि खासगी हॉटेलमध्ये राहून तुम्ही आंब्याची चव चाखू शकता. माझ्या मामाचा गाव सारखे प्रकल्प तुम्हाला कुटुंबासह संधी देत आहेत.महाराष्टÑातील लोकप्रिय असे महाबळेश्वर हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला मॅप्रो स्ट्रॉबेरी फेस्टीव्हलच्या निमित्ताने भेट देता येईल. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तुम्हाला जाता येईल. मेघालयातील सोहलिया या ठिकाणी व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने स्ट्रॉबेरी फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. अत्यंत ताजी स्ट्रॉबेरी या काळात खाता येते. जानेवारी ते मार्च या काळात हंगाम असतो.घोलवड आणि डहाणू जिल्ह्यात चिक्कूची मोठ्या प्रमाणावर शेती आहे. तारपा आणि सावे येथील शेतांमध्ये तुम्हाला सेंद्रीय शेतीची माहिती दिली जाते. चिक्कू शेती, त्याची लागवड, इतर पद्धती स्थानिक लोक सांगतात. या ठिकाणी नर्सरीही मोठ्या प्रमाणावर आहेत.