Join us

3849_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 06:44 IST

प्रीति जिंटाने तिचा तिच्या विदेशी बॉयफ्रेंडशी नुकतेच लग्न केले. मात्र बॉलीवुडमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांचा जीवनसाथी विदेशी निवडला आहे. अशाच काही स्टार्सचा घेतलेला हा आढावा...

प्रीति जिंटाने तिचा तिच्या विदेशी बॉयफ्रेंडशी नुकतेच लग्न केले. मात्र बॉलीवुडमधील बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांचा जीवनसाथी विदेशी निवडला आहे. अशाच काही स्टार्सचा घेतलेला हा आढावा...इंडस्ट्रीची डिंपल गर्ल म्हणून ओळख असलेल्या प्रीति जिंटाने विदेशी बॉयफ्रेंडशी लग्न केले. खरं तर मीडियामध्ये लग्नाची अगोदरच कुजबुज सुरू होती. मात्र लग्नाच्या बातम्यांमुळे प्रीति चांगलीच भडकली होती. असो प्रीतिच्या या वागण्यामुळे तिच्यावर कोणाचीही नाराजी नाही. तिने सुखाने संसार करावा हीच अपेक्षा.बॉलीवुडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सेलीना जेटलीने बॉलीवुडमध्ये धमाकेदार एंट्री केली होती. मात्र त्यानंतर काही फॉरेन ट्रिप्समध्ये तिची पीटर हाग याच्याशी भेट झाली. तिथेच दोघांची मने जुळली. सध्या या जोडप्याला जुळवा मुले आहेत.इंडस्ट्रीचे सीनियर अ‍ॅक्टर असलेल्या कबीर बेदी यांनी नुकतेच परवीन दुसंजशी चौथे लग्न केले. मात्र या चार लग्नाच्या लिस्टमध्ये एक विदेशी महिलेचे नाव आहे. सुसान हम्पराईज हिच्याशी त्यांनी लग्न केले होते.यशस्वी मॉडेल ते अ‍ॅक्टर असा प्रवास असलेल्या मिलिंद सोमनच्या प्रेमात आजही कित्येक हॉट मॉडेल पडायला तयार आहेत. परंतु त्याने फ्रेंच अ‍ॅक्ट्रेस मायलेन जाम्पनॉई हिला जीवनसाथी म्हणून निवडले. २००६ मध्ये सुपरमॉडेल मधु सप्रे हिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने मायलेनशी लग्न केले. मात्र २००९ मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला.कित्येक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये झळकलेल्या सुचित्रा पिल्लैने लार्स काजेल्डसेन या विदेशी व्यक्तीशी लग्न केले. या जोडप्याची एक मुलगी आहे. सुचित्राचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते. घटस्फोटानंतर वयाच्या ३४ व्या वर्षी तिने लार्सशी लग्न केले.आपल्या स्टाइलने अनेकांना घायाळ करणाºया शशि कपूरने हजारो भारतीय तरुणींचे मन तोडत फॉरेन अ‍ॅक्ट्रेस जेनिफर केंडल हिच्याशी लग्न केले. कॅँसरमुळे १९८४ मध्ये जेनिफरचा मृत्यू झाला. मात्र शशिने पुन्हा लग्न केले नाही.