Join us  

Jab We Met...! एअर होस्टेसला पाहून प्रेमात पडला होता पुष्कर जोग; भारी रोमॅन्टिक आहे ही लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 8:00 AM

1 / 9
‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ सगळ्यांची असते आणि अशीच एक रोमॅण्टिक लव्ह स्टोरी आहे ती अभिनेता पुष्कर जोग आणि त्याची पत्नी जास्मिनची .
2 / 9
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमवलेला अभिनेता पुष्कर जोग याचा आज वाढदिवस. आज आम्ही सांगणार आहोत ती पुष्कर व त्याची बायको जास्मिनची लव्हस्टोरी
3 / 9
15 जुलै 1985 रोजी पुणे येथे जन्मलेल्या पुष्करचे बालपण पुण्यातच गेले. त्याने विद्या भवन आणि जे. बी. जोग कॉलेजमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या चौथ्या वषार्पासून पुष्करने अभिनयास सुरुवात केली होती.
4 / 9
केवळ 4 वर्षाचा असताना पुष्करने डान्स आणि अभिनय सुरू केला. पुष्करने हम दोनो, ऐसी भी क्या जल्दी है, आझमाईश या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली होती.
5 / 9
पुष्करने महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. खूप कमी जणांना माहीत आहे की पुष्कर केवळ अभिनेताच नाही तर डेंटीस्टही आहे.
6 / 9
एका प्रवासादरम्यान पुष्करने एअर होस्टेस असलेल्या जास्मिनला पाहिले होते. तो प्रवास करत असलेल्या विमानातच जास्मिन एअर होस्टेस म्हणून काम पाहत होती.
7 / 9
तिला पाहताच पुष्कर तिच्या प्रेमात पडला आणि काही काळ डेटींग केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2014 साली पुष्करने जास्मिन ब्रामभट्टसोबत विवाह केला.
8 / 9
2017 मध्ये दोघांना फेलिशा नावाची मुलगी झाली. हे त्रिकोणी कुटुंब सध्या आनंदात जगत आहे. पुष्कर नेहमीच पत्नी व मुलीचे व्हिडीओ शेअर करत असतो.
9 / 9
पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.
टॅग्स :पुष्कर जोग