Join us  

Zanai Bhosle : आशा भोसलेंच्या नातीपुढे जान्हवी, साराही फेल; PHOTO पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 4:05 PM

1 / 11
आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातील रसिकांना भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. पण सध्या चर्चा त्यांच्या नातीची आहे. होय, जनाई भोसले हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 11
जनाई स्वत: एक गायिका आहे. मात्र सिंगींगपेक्षा अधिक तिच्या सौंदर्याची चर्चा आहे.
3 / 11
सौंदर्याच्या बाबतीत जनाई बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. जान्हवी, सारा, अनन्याही तिच्यापुढे फिक्या पडतील.
4 / 11
जनाई सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. इन्स्टावर ती रोज नवे फोटो शेअर करत असते.
5 / 11
मध्यंतरी जनाई अभिनयात येणार असल्याचीही चर्चा होती. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.
6 / 11
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आगामी चित्रपटातून जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते अशी चर्चा रंगली होती.
7 / 11
जनाई संगीत क्षेत्रात फारसं नाव कमावू शकली नाही. मात्र, तरीदेखील सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते. .
8 / 11
जनाईने देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरसाठी गाणं गायलं होतं. त्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती.
9 / 11
जनाईने संगीतासोबतच शबाना आझमी यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
10 / 11
जनाई सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते.
11 / 11
जनाईला फिरण्याची प्रचंड आवड असून कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिल्यावर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
टॅग्स :आशा भोसले