Join us

‘जुदाई’ मधील अनिल कपूरचा मुलगा आठवतोय? पहा, आता किती हॅण्डसम दिसतोय ओमकार कपूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

‘मासूम’,‘जुदाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये ‘चाईल्ड आर्टिस्ट’ म्हणून काम केलेला छोटा स्टार आठवतोय का? ज्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केलीय. ‘ओमकार कपूर’ आता मोठा झालाय.

‘मासूम’,‘जुदाई’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये ‘चाईल्ड आर्टिस्ट’ म्हणून काम केलेला छोटा स्टार आठवतोय का? ज्याने अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केलीय. ‘ओमकार कपूर’ आता मोठा झालाय. ओमकार कपूरचा हॅण्डसम लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. ‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटात तो आॅनस्क्रीन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसतोय.ओमकार कपूर याने आत्तापर्यंत गोविंदा, अनिल कपूर, सलमान खान आणि श्रीदेवी यांच्यासोबत लहानपणी काम केलंय.एकदा एक प्रसिद्ध टॉक शो ‘मुव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स’ यात शेखर सुमन याने त्याचा इंटरव्हयू घेतला होता. त्यावेळी त्याचा सुपरकूल अंदाज पाहण्यासारखा होता.संजय लीला भन्साळी, फराह खान आणि अहमद खान यांनी त्यांच्या चित्रपटात ओमकारला घेतले आहे.अभिनयाचा किडा अंगात असल्याने त्याला शांत बसवेना. म्हणून त्याने ‘प्यार का पंचनामा २’ साठी आॅडीशन दिले. त्याला मोठ्ठा ब्रेक मिळाला.‘प्यार का पंचनामा २’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेने बॉलिवूड रोमँटिक रोल्सचे सगळे नियम तोडले.