Join us  

Ananya Panday Affair: ईशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे या अभिनेत्याला करतेय डेट?, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 5:13 PM

1 / 8
अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. तिचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याशी जोडले जात आहे.
2 / 8
यापूर्वी अनन्या पांडेला शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत अनेकदा एकत्र दिसले होते. दोघेही अनेकदा एकत्र सुट्टीवर जाताना दिसले होते. इतकंच नाही तर अनन्याने इशानच्या कुटुंबियांना भेटायलाही सुरुवात केली होती.
3 / 8
शाहिदच्या वाढदिवसाच्या पार्टीतही अनन्या गेली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आली आणि आता अनन्या बॉलिवूडच्या दुसऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
4 / 8
लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सध्या बॉलिवूडचा हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. हे दोघे कधीच एकत्र दिसले नसले तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चा इंटरनेट जगतात खूप चर्चेत आहेत.
5 / 8
अनन्या आणि आदित्य कधीच चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. मात्र सध्या त्यांच्या अफेयरच्या चर्चेंने जोर धरला आहे.
6 / 8
आदित्य रॉय कपूर अनन्या पांडेपेक्षा एक-दोन वर्षांनी नाही तर १३ वर्षांनी मोठा आहे. आदित्य ३६ वर्षांचा आहे, तर अनन्या फक्त २३ वर्षांची आहे.
7 / 8
अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' चित्रपटात दिसणार आहे.
8 / 8
याशिवाय ती अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातही दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करते आहे.
टॅग्स :अनन्या पांडेइशान खट्टरआदित्य रॉय कपूर