Join us  

अलका कुबल यांनी शेअर केले लंडनमधील फोटो, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 3:25 PM

1 / 8
'माहेरची साडी','चार दिवस सासूचे', 'वहिनीची माया' अशा कितीतरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.
2 / 8
बराच काळ रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता. मध्यंतरी 'आई माझी काळुबाई' (aai mazi kalubai) या मालिकेत त्या झळकल्या. त्यानंतर आता पुन्हा त्या रुपेरी पडद्याकडे वळल्या आहेत.
3 / 8
लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.
4 / 8
दरम्यान त्यांनी लंडनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 8
या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
6 / 8
या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.
7 / 8
या चित्रपटाच्या निमित्ताने अलका कुबल आणि अजिंक्य देव ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
8 / 8
या चित्रपटानंतर अलका कुबल आणि अजिंक्य फार चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी त्या दोघांची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली.
टॅग्स :अलका कुबलपूजा सावंतअजिंक्य देव