Join us  

लेक अभिनेत्री असूनही अक्षया देवधरच्या आई-बाबा राहतात लाईमलाईटपासून कोसो दूर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 7:00 AM

1 / 10
काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत आपल्याला पाठक बाई आणि राणादा यांची जोरदार अशी केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
2 / 10
या मालिकेमध्ये आपल्याला राणादाच्या भूमिकेमध्ये अभिनेता हार्दिक जोशी दिसला होता. तर पाठक बाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला अक्षय देवधर ही अभिनेत्री दिसली होती. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
3 / 10
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडी खूप हिट ठरली. या दोघांनी अनेक जाहिरातीमधून देखील काम केले. खऱ्या आयुष्यात देखील आता राणादा आणि पाठक बाई विवाह बंधनात लवकरच अडकणार आहेत.
4 / 10
काही दिवसापूर्वीच त्यांचा साक्षगंध सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
5 / 10
अक्षय देवधर ही सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले अनेक फोटो टाकत असते.
6 / 10
सोशल मीडियावर अक्षय देवधर ही हार्दिक जोशी सोबतचे आपले काही फोटो नुकतेच शेअर केले होते. त्यांच्या या फोटोला अनेकांनी लाईक देखील केले होते.
7 / 10
अक्षया देवधर ही आपल्या कुटुंबाप्रती खूपच भावनिक आहे.
8 / 10
अनेक वेळा ती आपल्या आई वडील आणि कुटुंबाचे फोटो देखील शेअर करताना दिसत असते.
9 / 10
अक्षया देवधर हिने काही दिवसापूर्वीच आपल्या आई-वडिलांसोबत चे फोटो शेअर केले होते. अक्षया देवधरच्या आई वडिलांविषयी फारशी माहिती कुणाला नाही. अक्षय देवधरच्या आईचे नाव अर्चना देवधर असे आहे, तर वडिलांचे नाव महेश देवधर असे आहे.
10 / 10
अक्षया देवधरचे आई वडिल लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
टॅग्स :अक्षया देवधरतुझ्यात जीव रंगलाहार्दिक जोशी