Join us  

Aishwarya Narkar : '...पण ते प्रत्येकाला दिसत नाही', ऐश्वर्या नारकर यांचा पोस्टसोबत 'तो' फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 9:45 AM

1 / 9
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
2 / 9
‘या सुखांनो या’ मालिकेतील हळवी भूमिका असो आणि आता ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील निगेटिव्ह भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी कायम आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे.
3 / 9
वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल असे त्यांचे मनमोहक रुप आहे. त्यांच्याकडे बघून अनेकांना वयाचा अंदाजही येणार नाही.
4 / 9
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्या बऱ्याचदा फोटो शेअर करत असतात.
5 / 9
नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
6 / 9
या फोटोत ऐश्वर्या नारकर बागेत बसलेल्या दिसत आहेत. यात त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असते, पण प्रत्येकाला ते दिसत नाही.
7 / 9
ऐश्वर्या नारकर यांच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने लिहिले की, अप्रतिम फुलपाखरू दिसत आहात. अभिनेत्री तितिक्षा तावडेने सुंदर अशी कमेंट केली आहे.
8 / 9
ऐश्वर्या नारकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असतात.
9 / 9
ऐश्वर्या नारकर सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत सासूची भूमिका साकारत आहेत.यामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिकाही तेवढीच उत्तमरित्या निभावली आहे.
टॅग्स :ऐश्वर्या नारकर