Join us

अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका

By admin | Updated: February 25, 2016 00:00 IST

जेलमध्ये अनेक मित्र झाले त्यांच्याशी भावासारखं नातं निर्माण झालेसेलिब्रिटी म्हणून मला जेलमध्ये कधीच विशेष सुविधा मिळाल्या नाहीत२३ ...

जेलमध्ये अनेक मित्र झाले त्यांच्याशी भावासारखं नातं निर्माण झाले

सेलिब्रिटी म्हणून मला जेलमध्ये कधीच विशेष सुविधा मिळाल्या नाहीत

२३ वर्ष ज्या दिवसासाठी मी अक्षरश: मरत होतो तो हा आजचा आझादीचा दिवस आहे. आज मला वडिलांची तीव्रतेने आठवण येत आहे. मला मुक्त झालेलं त्यांना बघायचं होतं

मान्यता माझी शक्ती असून ती माझी खास मैत्रीणही आहे. मान्यतानं खूप सहन केलं मी जेलमध्ये होतो त्यावेळी दोन मुलांना संभाळणं निर्णय घेणं सारं काही तिनं केले आहे.

जेलमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे काम केले काही दिवस जेल प्रशासन चालवत असलेल्या रेडिओ स्टेशनवर जॉकी म्हणून काम केले.

कुटुंबासाठी वेळ देणार आणि अपूर्ण राहिलेल्या चित्रपटांच्या कामाला पुन्हा सुरूवात करणार.

मी ९३ बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेलो नाही शस्त्रास्त्र कायद्यानुसार दोषी ठरलो आणि त्याची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडलो आहे

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

जेलमध्ये काम करून कमवलेले पैसे मी एका चांगल्या पतीच्या नात्याने माझ्या पत्नीला दिले

न्यायालयाने दहशातवाद्याचा शिक्का पुसला तोच माझ्यासाठी मोठा दिलासा आहे असे मत संजय दत्त याने बांद्रा येथिल पत्रकार परिषेदेत मांडले.