Join us  

Prasad Oak: लग्नापूर्वीच प्रसाद-मंजिरी झाले होते एकमेकांचे नवरा-बायको; वाचा त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:28 PM

1 / 11
अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता. आज अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वतःचं स्थान निर्माण केलयं. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 11
आज प्रसाद ओक त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया प्रसाद आणि मंजिरी ओक (manjiri oak) यांची लव्हस्टोरी.. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 11
मंजिरी आणि प्रसाद यांचं लव्ह मॅरेज असून अभिनेत्री पल्लवी अजयच्या 'असोवा' ( AaSoVa) या शोमध्ये मंजिरीने त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी सांगितली. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 11
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak). प्रसादप्रमाणेच मंजिरीही कलाविश्वात सक्रीय असून तिने प्रसादसह अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट डारेक्टरचं काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 11
मंजिरी म्हणाली, 'प्रसाद एक अ‍ॅक्टिंगचं वर्कशॉप घ्यायचा. साधारणपणे आमचं वर्कशॉप तीन-साडेतीम महिन्यांचं होतं. त्यात मी भाग घेतला होता. त्यामुळे मी त्याची विद्यार्थिनी होते आणि तो आमचा दिग्दर्शक. हे वर्कशॉप संपत असताना त्याने एक महोत्सव आयोजित केला होता.'' (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 11
ज्यात त्याच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याने काही एकांकिका सादर केल्या होत्या. यात त्याने पाच एकांकिका बसवल्या होत्या आणि या सगळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला कास्ट केलं होतं. फक्त मी एकटीच राहिले होते जिला कशातच घेतलं नव्हतं. त्यावेळी आमचं काही रिलेशन वगैरे नव्हतं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 11
त्यामुळे माझं असं झालं की, मी सुद्धा पैसे भरलेत मग मलाही काम मिळायला हवं. म्हणून मी त्याला भेटले आणि सांगितलं की मलाही काम करायचंय. त्यावर, तुझ्यासाठीही काम शोधतोय असं त्याने मला सांगितलं.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 11
या काळात कामाच्या निमित्ताने आमचा कॉन्टॅक्ट वाढला होता आणि एकमेकांना आम्ही आवडू लागलोय हे आम्हाला कळू लागलं होतं', असं मंजिरी म्हणाली. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 11
पुढे ती म्हणते, 'त्याच वर्षी एका दिवाळी अंकात त्याला क्रॉस कनेक्शन ही एकांकिका सापडली. दोन पात्रांची कॉमेडी एकांकी होती, ज्यात फक्त नवरा आणि बायको होते. त्या त्याने मला कास्ट केलं. पण, मग नवऱ्याची भूमिका कोण करणार हा प्रश्न होता. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 11
अखेर मित्रांच्या सांगण्यावरुन प्रसादने नवऱ्याची भूमिका साकारली. या एकांकिकेमुळे आम्ही जवळ आलो आणि आमचं नातं सुरु झालं. त्यामुळे 'क्रॉस कनेक्शन' आमच्यासाठी खास आहे.' (फोटो इन्स्टाग्राम)
11 / 11
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी