Join us

PHOTO : शाहिद कपूरच्या भावाला डेट करतेय करिनाची मुलगी

By admin | Updated: January 5, 2017 12:50 IST

सैफ अली खानची मुलगी सारा सध्या तिच्या अफेअरच्या चर्चांमुळे बरीच चर्चेत आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - सैफ अली खानची मोठी मुलगी सारा अली खान बॉलिवूडच्या चकाकत्या दुनियेत एन्ट्री करणार असल्याच्या बातम्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत होती. मात्र सध्या ती वेगळ्या कारणांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ही चर्चा आहे तिच्या अफेयरची. आता साराचे नाव जोडले गेले आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि सावत्र आई करिनाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत. 
 
यापूर्वी सारा माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीरसोबत अफेअर होते, अशी चर्चा होती. त्यानंतर सारा आपला खास मित्र अरहानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर सारा आणि अरहानचे फोटो सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 
(बर्थडे गर्ल दीपिकाबद्दलच्या या रंजक गोष्टी माहीत आहेत का?)
 
मात्र, सारा या दौघांपैकी कुणालाही डेट करत नसल्याची माहिती समोर आली. तर तिचे अफेअर शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टरसोबत सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या  'स्टुडंट ऑफ द इअर - 2' सिनेमात हे दोघं एकत्र दिसणार होते, असे बोलले जात होते, मात्र तसं काही घडून आले नाही.  
(ट्विटरवर मुलांचा धर्म विचारणा-याला शिरीष कुंदरचं सडेतोड उत्तर)
 
मात्र, दोघांनीही झगमगती दुनिया बॉलिवूडलाच आपले करिअर म्हणून निवडले आहे. पण कोणत्या सिनेमाद्वारे हे दोघं इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. इशान मराठी सिनेमा 'सैराट'च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये येणार असल्याची चर्चा आहे तर सारा हृतिक रोशनसोबत झळकणार असल्याचे बोलले जात आहे.