बॉलीवूडचा चॉकलेट हीरो शाहिद कपूर आणि नवोदित अभिनेत्री परिणिती चोप्रा लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक अभिषेक चौबे आता एक सायन्स नॅचरल थ्रिलर चित्रपट बनविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अभिषेकने या चित्रपटासाठी शाहिदची निवड केली आहे. शाहिदने आजवर रोमँटिक कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. पहिल्यांदाच तो एका सायन्स नॅचरल थ्रिलरमध्ये काम करणार आहे. या चित्रपटासाठी परिणितीची निवड करण्यात आल्याचे कळते. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल.