‘दगडी चाळ’, ‘वृंदावन’, ‘पोश्टर बॉइज’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंत हिला माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी ‘लपाछुपी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा स्पेनमध्ये होणार असल्याचे पूजाने ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगितले. पूजा म्हणाली, विशाल फ्युरिया दिग्दर्शित लपाछुपी हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एका गर्भवती महिलेचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचा प्रोमो लवकरच आउट करण्यात येईल. तसेच या पुरस्काराच्या नामांकनासाठी मी स्वत:ला खूप प्राउड फिल करीत आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध हॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत हे नामांकन असल्याने खूप आनंददेखील होत आहे. पण, मला एवढ्यावरच थांबायचे नाही. खूप पुढे जायचे आहे.
माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात पूजाला नामांकन
By admin | Updated: May 7, 2016 04:38 IST