Join us  

Oscars 2023 : ऑस्कर 2023 वर भारतीयांचा नजरा, शर्यतीत आहेत हे भारतीय चित्रपट  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 4:14 PM

Oscars 2023: सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर... यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठीही खास असणार आहे. कारणही खास आहे.

Oscar Nominations 2023 : सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. संपूर्ण जगाचं लक्ष Oscar 2023 कडे लागलं आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठीही खास असणार आहे. कारणही खास आहे. यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील आहे. याशिवाय ऑल दॅट ब्रीथ्स आणि द एलिफंट व्हिस्पर्स हे सिनेमे ऑस्करच्या शर्यतीत आहेत. ऑस्कर नॉमिनेशनसाठी भारतीय सिनेमांची निवड होणार की नाही हे काही तासांतच कळणार आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. 95 वा अकादमी पुरस्कार आज रविवारी (12 मार्च) लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. अमेरिकन वेळेनुसार ऑस्कर सोहळा १२ मार्च ला रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार १३ मार्चला पहाटे ५ वाजता हा कार्यक्रम दिसणार आहे. ऑस्कर रेड कार्पेट प्रेस शो संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रेक्षकांना हा कार्यक्रम Oscars.org बरोबर YouTube TV आणि डिस्नी पल्स हॉटस्टारवर पाहता येईल.

आरआरआर

भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्सही ऑस्करच्या मंचावर बघायला मिळणार आहे. नुकतंच नाटू-नाटूला गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.. त्यानंतर नाटू-नाटूने पुन्हा आपली घोडदौड कायम ठेवत ऑस्करच्या नामांकन यादीत नाव पटकावलं आहे. ऑल दॅट ब्रीथ्स...

शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स' (All That Breathes) या भारतीय गुजराती चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये डॉक्युमेंटरी फीचर फिल्म  श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. राजधानी दिल्लीतील मोहम्मद सौद आणि नदीम शहजाद या दोन भावंडांची कथा यात आहे. या दोन्ही भावंडांनी जखमी पक्ष्यांना, विशेषतः गरुडांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं आहे. 

द एलिफंट व्हिस्परर्स

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. द एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा आहे.  ते दोन बेबंद हत्ती यांना दत्तक घेतात आणि त्यांचं कसं संगोपन करतात यावर ही बेतलेली आहे. ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांनी डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. कार्तिकी गोन्साल्विस यांनी  दिग्दर्शन केलं आहे.

अन्य नामांकनांची यादी 

सर्वोत्कृष्ट सिनेमा (Best Picture)अवतार : द वे ऑफ वॉटर Avatar : The Way Of Waterथार Tarद बेंचेस ऑफ इनशेअरिन The Banshees Of Inisherinएलविस Elvisएवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स Everything Everywhere All at onceद फेबलमन्स The Fabelmansटॉप गन मेव्हरिक Top Gun Maverickट्रिंगल ऑफ सॅडनेस Triangle Of Sandness

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress)कॅटे ब्लेनचेट Cate Blanchett (थार)अॅना दे अर्मास Ana De Armas (ब्लोन्ड)Andrea Riseborough Andrea Riseborough (To Leslie)मिचेले व्हिल्यम्स Michelle Williams

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor)ऑस्टिन बस्टलर (Austin Butler)कोलिन फरेल (कोलिन फरेल)ब्रेडन फ्रासर (Brendan Fraser)पौल मस्कल (Paul Mescal)

सर्वोत्कृष्ट माहितीपट (Documentry Feature)ऑल दॅट ब्रीथ्स (All That Breathes)ऑल द ब्यूटी ॲन्ड द ब्लडशेड (All The Beauty And The Bloodshed)फायर ऑफ लव्ह (Fire Of Love)अ हाऊस मेड ऑफ स्पील्नटर्स (A House made Of Splinters)

मूळ पटकथा (Original Screenplay) :द बॅनशीस ऑफ इनशिरिन (The Banshees Of Inisherin)एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स (Everything Everywhere All at once)ट्रॅंगल ऑफ सॅडनेस (Traingle Of Sadness)

टॅग्स :ऑस्करऑस्कर नामांकनेआरआरआर सिनेमा