Join us

पुन्हा एकदा ‘वाडा चिरेबंदी’

By admin | Updated: November 8, 2014 03:32 IST

महेश एलकुंचवार या नावाने मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला आहे. एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक सुमारे ३० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले

महेश एलकुंचवार या नावाने मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला आहे. एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक सुमारे ३० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले आणि त्यानं इतिहास घडवला. विजया मेहता यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्यानंतर एलकुंचवार यांनी त्याचे पुढचे भाग ‘युगांत’ आणि ‘भग्न तळ््याकाठी’ लिहिले. १९९४ मध्ये या दोन भागांसह ‘वाडा चिरेबंदी’ या तिन्ही नाटकांचा एकत्रित प्रयोग ‘त्रिनाट्यधारा’ नावाने गाजला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केले होते. आता यातील पहिला भाग म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा रंगभूमीवर येत आहे. हे नाटक नव्या पिढीला पहायला मिळावे, त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. त्याचा पहिला प्रयोग आज (ता. ८) मुंबईत पु. ल. देशपांडे युवा कलामहोत्सवात रवींद्र नाट्य मंदिर येथे होत आहे. रसिकांना त्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे.