सो नाली केबल या चित्रपटाचे निर्माते सध्या संकटात सापडले आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्यामुळे त्यांना आता प्रमोशनसाठी लीड अॅक्ट्रेस रिया चक्रवर्तीकडून वेळ मिळेनासा झाला आहे. सोनाली केबल हा चित्रपट येत्या 17 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. या तारखेच्या आठवडाभरापूर्वी हा चित्रपट रिलीज होण्याचे ठरवण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते रोहन सिप्पी सध्या रियावर नाराज आहेत. त्यांच्या मते, त्यांनी काही आठवडय़ांपूर्वीच रिलीज डेटमधील बदलांबाबत कलाकारांना कल्पना दिली होती. ते सांगतात, ‘आम्ही कलाकारांना याबाबत आधीच कल्पना दिली होती. पण रियाकडून आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाहीय. ती चित्रपटात टायटल भूमिकेत आहे.