Join us

करिनासोबत काम करण्यास ‘नो प्रॉब्लेम’

By admin | Updated: December 20, 2014 21:14 IST

अभिनेत्री करिना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या शाहिद कपूरने सांगितले की, करिनासोबत चित्रपटात काम करण्यास त्याची काहीही हरकत नाही,

अभिनेत्री करिना कपूरचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या शाहिद कपूरने सांगितले की, करिनासोबत चित्रपटात काम करण्यास त्याची काहीही हरकत नाही, त्याने कधीही त्याला नकारही दिलेला नाही. अभिषेक चौबेच्या उडता पंजाब या चित्रपटात शाहिदसोबत करिना दिसणार असल्याची चर्चा होती; पण ती या चित्रपटात काम करीत आहे की नाही याची कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटात मी काम करणार आहे, हे मला माहिती; पण इतर कलाकारांची माहिती तुम्हाला दिग्दर्शकच देऊ शकतील, असे तो म्हणाला. करिना आणि शाहिद यांचे प्रेमसंबंध चार वर्षे टिकून होते.