Join us  

निळू फुले यांची मुलगी आहे टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 3:21 PM

Tula Pahate Re मालिका संपली असली तरी मालिकेच्या प्रत्येक कलाकाराच्या भूमिका आजही रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) आणि गायत्रीच्याआईच्या भूमिकेतील गार्गी फुले थत्ते यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असायची.

ना गब्बर सारखी बडबड, ना मोगॅम्बोसारखी आरडाओरड. मात्र त्यांच्या आवाजात होता भारदस्तपणा. घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा. ही ओळख आहे निळू भाऊ अर्थात निळू फुले (Nilu Phule) यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव आणि संवाद हे निळू फुले यांचं खरं बलस्थान होते. त्यांच्यानंतर निळू फुलेंची मुलगी चित्रपटसृष्टीत रसिकांचं मनोरंजन करत आहेत. 

निळू फुले यांच्या मुलीचे नाव आहे गार्गी फुले थत्ते (Gargi Phule Thatte). छोट्या पडद्यावर गाजलेली  ‘तुला पाहते रे’मालिकेत गार्गी झळकल्या होत्या.मालिकेत ईशाची आई सौ. निमकर यांची भूमिका त्यांनी साकारली होती. सौ.निमकरही भूमिकाही प्रचंड गाजली होती.गार्गी यांनी 'तुला पाहते रे' (Tula Pahate Re) या मालिके आधी 'कट्टीबटी' (KattiBatti Serial) या मालिकेतही काम केले होते पण या मालिकेतून त्यांना पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 'तुला पाहते रे' या मालिकेतून त्या खूप लोकप्रिय झाल्या.

 

मालिका संपली असली तरी मालिकेच्या प्रत्येक कलाकाराच्या भूमिका आजही रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) आणि गायत्रीच्याआईच्या भूमिकेतील गार्गी फुले थत्ते यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असायची. मालिकेतले सगळेच कलाकार घराघरात प्रसिद्ध झाले होते. कलाकारांच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात रसिकांना इच्छा असते.अगदी या कलाकारांच्याही चाहत्यांनाही त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अपडेट जाणून घेण्यात प्रचंड रस होता. 

आज मालिका बंद झाल्यानंतर  सोशल मीडियावरच चाहते त्यांच्या संपर्कात असतात. तसेच दिलेल्या एका मुलाखतीत गार्गी यांनी निळू फुले यांची आठवण सांगितली होती. निळू फुले त्यांना नेहमी म्हणत ''जेव्हा तू कॅमेरा समोर असतेस तेव्हा, तूच अमिताभ बच्चन आहेस असं समज. तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असला तरी तुझा अभिनय हा दमदारच असला पाहिजे''. गार्गी यांनीसुद्धा बाबांनी दिलेली शिकवण कायम लक्षात ठेवणार आणि रसिकांचे अविरत मनोरंजन करत राहणार असे सांगितले होते. 

टॅग्स :निळू फुलेतुला पाहते रे