फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध झालेला निखिल रानडे आता पार्श्वगायनाकडे वळला असून, नुकताच त्याचा ‘यार’ हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या अल्बममधील गीतांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर ‘यार’ हे एक रोमँटिक गाणे आहे. निखिल रानडे, रेवती लेले, सोनाली माने, राहुल शर्मा यांच्यावर हे चित्रित झाले आहे. अल्बमच्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल निखिल सांगतो, ‘‘मला पहिल्यापासूनच फोटोग्राफीबरोबर गाण्याची आवड होती. मी गायिलेले कव्हरसाँग संगीतकार निहारला ऐकवले. त्याने मला म्युझिक व्हिडीओ बनवण्यास सुचवले आणि या गाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या कल्पनेला शब्दांमध्ये गंधार कदमने उतरवले, निहारने त्याला संगीत दिले. ‘यार’ हे गाणे म्हणजे आमच्या निर्मिती संस्थेचा पहिला म्युझिक व्हिडीओ आहे. नवीन संगीतकार, गीतकार, गायक आणि अभिनयामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे, हा निर्मिती संस्था सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’’
निखिल रानडे वळला पार्श्वगायनाकडे
By admin | Updated: October 27, 2015 23:59 IST