मागून आलेल्या नव्या अभिनेत्रींच्या यशाने नाखुश असलेल्या कॅटरिना कैफच्या नखर्यांनी आता युनिट मेंबर्स त्रस्त झाले आहेत. ‘बँग बँग’च्या सेटवर उपस्थित एका सूत्रांनुसार कॅटरिना कैफचे नखरे आता वाढत चालले आहेत. नुकतेच ग्रीसमध्ये चित्रित करण्यात आलेल्या एका अँक्शन सीन्सच्या वेळी तिचे असेच नखरे सहन करावे लागल्याचे त्याने सांगितले. सूत्रांनुसार त्यादिवशी एक सामान्य फोटो शूट होता, त्यामुळे स्थानिक फोटोग्राफर्सना बोलावण्यात आले होते. कॅटरिनाला हे समजले तेव्हा ती खूपच रागावली. तिने तिच्या आवडत्या फोटोग्राफरला बोलावण्याची मागणी केली. तिला निर्मात्याने खूप समजावले; पण ती काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी तिच्या आवडीच्या फोटोग्राफरला तिथे बोलावण्यात आले.
नखरेल कॅट
By admin | Updated: June 19, 2014 10:50 IST