Join us

आकर्षक कथानकाचे सुमार प्रदर्शन !

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

आपल्या कौटुंबिक व्यवस्थेत पुरुष हे नोकरी करण्यासाठी घराबाहेर जातात, तर महिला घरातील जबाबदाऱ्या सांभाळतात. परिस्थिती बदलली आणि घराची चौकट ओलांडून महिला नोकरीसाठी

- हिंदी चित्रपट : अनुज अलंकारकि अ‍ॅण्ड का आपल्या कौटुंबिक व्यवस्थेत पुरुष हे नोकरी करण्यासाठी घराबाहेर जातात, तर महिला घरातील जबाबदाऱ्या सांभाळतात. परिस्थिती बदलली आणि घराची चौकट ओलांडून महिला नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या; पण पुरुषांसाठी घर सांभाळणे आजही कठीण काम समजले जाते. आर. बाल्की यांच्या या कि अ‍ॅण्ड का या चित्रपटात या पारंपरिक व्यवस्थेलाच आव्हान देण्यात आले आहे. म्हणजेच, यातील तरुण घर सांभाळतो तर तरुणी नोकरी करू शकते. हे कथानक आहे दिल्लीतील. किया (करीना कपूर) एक मॉडर्न तरुणी आहे. जी आपल्या आईसोबत (स्वरूप संपत) राहते आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीत ती नोकरी करते. कियाची ओळख कबीरसोबत (अर्जुन कपूर) होते. जो एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा आहे; पण त्याला आपल्या वडिलांच्या संपत्ती आणि व्यवसायाबाबत काही आकर्षण नाही. कबीरला आपल्या आईप्रमाणेच जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत. कियासोबतच्या प्रेम प्रकरणानंतर कबीर तिच्याशी विवाहबद्ध होतो; पण विवाहानंतर किया नोकरीत व्यस्त होऊन जाते, तर कबीर घराची जबाबदारी सांभाळतो. घराची जबाबदारी सांभाळताना कबीर सेलीब्रिटी बनतो. कियाला हे आवडत नाही आणि याच कारणावरून दोघांत खटके उडू लागतात. याच काळात कियाची आई आजारी पडते आणि यासाठी किया कबीरला जबाबदार ठरविते. दोघांचे नाते अधिक बिघडण्यापूर्वीच या दोघांनाही आपापल्या चुकांची जाणीव होते आणि पुन्हा त्यांचे नाते अधिक घट्ट होते. उणिवा : दिग्दर्शक म्हणून आर. बाल्की यांनी पुन्हा एकदा तीच चूक केली आहे जी शमिताभमध्ये केली होती. या वेळीही त्यांच्याकडे आकर्षक कथानक होते; पण कुठे वास्तव आणि कुठे फिल्मी बनविण्यात स्क्रिप्टचे संतुलन बिघडल्यासारखे वाटते. चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ आहे. चित्रपटाचा मध्यंतरापर्यंतचा भाग हा कबीर आणि किया यांच्या नातेसंबंधावर भाष्य करीत राहतो. दुसऱ्या भागात चित्रपट गती घेतो; पण चित्रपटाचे कथानक वास्तव नव्हे, तर फिल्मी वाटायला लागते. क्लायमॅक्स अपेक्षित असाच आहे. आर. बाल्की यांनी नव्या प्रकारचे कथानक निवडून साहस दाखविले खरे; पण क्लायमॅक्समध्ये यातील फोलपणा दिसून येतो. अर्जुन कपूर आणि करीना यांचे सादरीकरणही विशेष वाटत नाही. अर्जुन कपूरच्या सादरीकरणात अभिनयाची ती खोली दिसत नाही. करीना कपूरच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम दिसून येतो. अर्जुन कपूर आणि करीना यांचे हॉट सीन कुटुंबासोबत कोणी पाहू शकत नाही. चित्रपटाचे संंगीतही फारसे परिणामकारक नाही. एकूणच काय तर विवाहित जोडपीच या चित्रपटाबाबत उत्सुक असू शकतात. बाकी प्रेक्षकांसाठी अर्जुन आणि करीनाचा रोमान्स आहेच. वैशिष्ट्ये :आर. बाल्की यांनी चित्रपटासाठी एक नवा विषय निवडला आहे. किमान आजच्या पिढीला या नव्या विषयाची जाणीव नक्कीच होईल. चित्रपटाचे कथानक महानगरात राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या विवाहित जोडप्यांशी थेट नाते सांंगते. नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळताना असे जोडपे आपले नाते मात्र हरवून बसतात. अर्थात कथानक पूर्णपणे आधुनिक बाजाचे आहे. म्हणजेच यातील विवाहित तरुणीला आपल्या आईच्या उपस्थितीत आपल्या पतीसोबत रोमान्स करायला काही संकोच वाटत नाही. यातील आईही आधुनिक आहे. चित्रपटाचे सेट डिझाइन अधिक आकर्षक आहे. कबीर आणि कियाच्या घराला रेल्वेशी जोडून जे डिझाइन केले गेले आहे ते अप्रतिमच. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अमिताभ आणि जया बच्चन यांची जोडी छानच वाटते. या चित्रपटाचा विषय अमिताभ आणि जया बच्चन यांच्या अभिमान या चित्रपटाच्या अगदी विरुद्ध आहे. या चित्रपटात अर्जुन आणि करीनाचे हॉट सीनही आहेत. दुबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंतचे लोकेशन छानच आहेत. का पाहावा? नव्या प्रकारचे कथानक़ का पाहू नये? चित्रपटाची संथगती. सुमार सादरीकरण आणि तोच तो क्लायमॅक्स.