Join us  

नेहा महाजनने सुरु केले शूटिंग, या सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 1:27 PM

. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी 'बाबू' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. चित्रीकरण सध्या एकदम जोमात सुरु आहे. चित्रीकरण आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून नुकताच या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रित करण्यात आला होता. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स असून त्यासाठी अंकितने बरीच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले. अंकितचे ऍक्शन सीन्स व्हायरल झाले होते.त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. या वेळी अंकितसोबत अभिनेत्री रूचिरा जाधवही उपस्थित होती. ‘बाबू’मध्ये अंकित, रूचिरासोबत नेहा महाजनही दिसणार आहे.

आता नेहा महाजनची एंट्री झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली नेहा महाजन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यामुळे नेहाचा हा एकंदर पेहराव बघून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता नेहाची भूमिका काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. 'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.

नेहा महाजनला अभिनयासोबतच सितार वादनाचीही आवड आहे.सोशल मीडियामुळेच तिची ही कला जगासमोर आली होती.  नेहाच्या सोशल मीडियावर नेहमी आपले सितार वादनाचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओंना रसिकांकडून आणि चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. गेल्या 13 वर्षांपासून नेहाने अभिनयासोबतच सितार वादनाचीही ती आवड चांगलीच जोपासली आहे. सितार वादनाचे रितसर तिने धडेही गिरवले आहेत. 

टॅग्स :नेहा महाजन