Join us  

एकेकाळी लोकांच्या घरी धुणीभांडी करणारी, आज आहे मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 1:08 PM

मुळात नेहा दिसायला सुंदर होती. त्यामुळे वेळीच तिच्यातले टॅलेंड ओळखून तिच्या शेजारीऱ्यांनी तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. नेहानेही या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आणि मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. बघता बघता नेहालाही यश मिळाले आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करणे तिच्यासाठी सोपं नव्हतं. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही वाटेत असंख्य संकटांचाही तिला सामना करावा लागला. मात्र हार न मानता यातूनही मार्ग काढत आज ती इथवर पोहचली आहे.

चंदेरी दुनियेत मराठी कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडतात. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळ्या काही गोष्टी आज त्यांच्याकडे आहेत. पण अभिनयाची आवड असली तरी सुरुवातीलाच प्रत्येकाला काही यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी कलाकारांना खूप संघर्षही करावा लागतो. दोन पैसे कमावण्यासाठी अनेक कलाकारांना मिळेल ती काम करावी लागतात. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच अनेक कलाकार आज यशशिखरावर आहेत. याच यादीत नेहा खान या अभिनेत्रीचा उल्लेख करावा लागले.

नेहा खानला या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. एकेकाळी दुसऱ्यांकडे धुणीभांडीही तिने केली आहेत. घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे घरखर्चासाठी नेहाला हे काम करावे लागले होते.विशेष म्हणजे धुणीभांडी करुन जितके पैसे मिळायचे. त्या पैशातून एक म्हैस घेतली होती. तिचा भाऊ म्हशीचे दुध विकून पैसे कमवायचा.

मुळात नेहा दिसायला सुंदर होती. त्यामुळे वेळीच तिच्यातले टॅलेंड ओळखून तिच्या शेजारीऱ्यांनी तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. नेहानेही या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आणि मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.

बघता बघता नेहालाही यश मिळाले आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करणे तिच्यासाठी सोपं नव्हतं. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, वाटेत असंख्य संकटांचाही तिला सामना करावा लागला. मात्र हार न मानता यातूनही मार्ग काढत आज ती इथवर पोहचली आहे.

‘देवमाणूस’ही तिची पहिलीच मालिका होती. एसीपी दिव्या सिंगची भूमिका तिने साकारली होती.या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकाच नाहीतर याआधी  'शिकारी' सिनेमात आणि 'काळे धं दे' यांसारख्या वेब सिरीजमध्येही ती झळकली आहे. इतकंच काय तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसह तिने एका कार्यक्रमात भाग घेतला होता. आज तिच्याकडे अनेक ऑफर्स असून आगामी काळात वेगवेगळ्या भूमिकेतून ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या बोल्ड लूकमुळेही ती प्रचंड चर्चेत असते. 

टॅग्स :नेहा खान