Join us  

अभिनेत्री बनण्यासाठी नीना गुप्ता यांना करावं लागलेलं कॅफेमध्ये काम, म्हणाल्या, "मुंबईत आल्यानंतर.."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:00 PM

नीना गुप्ता त्यांच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्याला घेऊनही चर्चेत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात कायम यशस्वी होतात. त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. नीना गुप्ता त्यांच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. आज त्या ज्या ठिकाणी पोहोचल्या आहेत त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. 

अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. ज्यावेळी त्या अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. नीना सांगितले की, त्या इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी बॉयफ्रेंडसोबत दिल्लीहून मुंबईत आल्या होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईत आल्यानंतर त्या पृथ्वी कॅफेमध्ये काम करू लागली. त्या कॅफेमध्ये काम करायच्या जेणेकरून त्यांना मोफत जेवण मिळावे. एनएसडीमध्येही झाडू मारण्यापासून त्यांनी सर्व काही केले आहे. अभिनेत्रीने सांगितलं त्यांना कोणत्याही काम करायची कधीच लाज वाटली नाही.पण लोकांकडे पैसे मागताना त्यांना लाज वाटायची. नीना पुढे म्हणाली की, त्यावेळी माझा बॉयफ्रेंड मला खूप टोमणा मारायचा. तो अनेकदा मला म्हणायचा, “लाज बाळग… तू इथे मोलकरीण बनायला आली आहेस का?” असे म्हणून तो माझ्याकडे सिगारेटसाठी पैसे मागायचा. 

 नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी काही दिवसांपूर्वीच 'फेमिनिझम' फालतू मुद्दा असल्याचं विधान केलं होतं. तसंच पुरष जोवर मूल जन्माला घालू शकत नाहीत तोवर स्त्री-पुरुष समानता होणार नाही असंही त्या म्हणाल्या होत्या.  नीना गुप्ता यांच्या फेमिनिझमवरील मुद्दयावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या तसंच त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी ा वादावर मौन सोडलं. फालतू फेमिनिझम वादावर नीना गुप्ता म्हणाल्या, 'माझं वक्तव्य वाद पसरवण्यासाठी वापरलं गेलं आहे. केवळ फालतू फेमिनिझमचं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं आहे. तेवढंच ऐकून लोक आपापसात वाद घालत आहेत. कोणी माझं समर्थन करतंय तर कोणी माझ्यावर टीका करतंय. पण माझे चाहते पूर्ण मुलाखत पाहा असा सल्ला देत आहेत.'

टॅग्स :नीना गुप्ता