Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाझुद्दीनने धरला चक्क सनी लियोनीसोबत ताल, पाहा बत्तिया बुझादो हे भन्नाट गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:00 IST

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटात बत्तिया बुझादो या गाण्यावर नवाझुद्दीन थिरकताना दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यात त्याच्यासोबत सनी लियोनी देखील ताल धरणार आहे.

ठळक मुद्देसनी सांगते, हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर मी या गाण्याच्या प्रेमातच पडले होते. या गाण्याची ट्यून अतिशय कॅची असून बत्तिया बुझादो हे डान्स साँग आहे.

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असून नवाझुद्दीनचा एक वेगळा अंदाज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा एक मजेदार चित्रपट असणार हे प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात आले आहे.

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटात बत्तिया बुझादो या गाण्यावर नवाझुद्दीन थिरकताना दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यात त्याच्यासोबत सनी लियोनी देखील ताल धरणार आहे. हे गाणे एक प्रमोशनल साँग असून हे गाणे रसिकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.

मोतिचूर चक्कनाचूर या चित्रपटाचे दिग्दर्शन देबामित्रा बिस्वास यांनी कले असून पुष्पिंदर त्यागी आणि अनिता अवस्थी यांची कथा पाहायला मिळणार आहे. हे गाणे रामजी गुलाटीने गायले असून संगीतही त्यानेच दिले आहे. त्याच्यासोबत ज्योतिका तंगरीने रामजीसोबत बत्तिया बुझादो हे गाणे गायले आहे.

या गाण्याविषयी सनी सांगते, हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर मी या गाण्याच्या प्रेमातच पडले होते. या गाण्याची ट्यून अतिशय कॅची असून बत्तिया बुझादो हे डान्स साँग आहे. त्यामुळे विविध पार्टींमध्ये लोक या गाण्यावर थिरकणार यात काहीच शंका नाही. नवाझसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तो डान्स करत असताना देखील मजा मस्ती करत होता. हे गाणे लोकांना आवडेल याची मला खात्री आहे. 

या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओज आणि वुडपेकर मुव्हीज, राजेश आणि किरण भाटिया यांनी केली असून हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसनी लिओनी