Join us  

सेक्ससाठी नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:05 AM

नर्गिसनं सोशल मीडियावर एका पोस्टमधून तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला होता.यासोबतचं एक पब्लिक फिगर म्हणून जगणं किती कठीण हे सांगत तिचा फॅट टू फिट असा प्रवास तिनं शेअर केला होता.

रॉकस्टारमुळं चर्चेत आलेली अभिनेत्री नरगिस फाकरीने दिलेल्या मुलाखतीत झगमग दिसणा-या दुनियेचं वास्तव जगासमोर आणले होते. “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला प्लेबॉय मॅगेझिनसाठी ऑफर आली होती. हा खूप मोठा ब्रँड आहे. यातून भरपूर पैसाही मिळाला असता. परंतु चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी कोणतीही गोष्ट मला करायची नव्हती. त्यामुळे मी सर्व ऑफर्स धुडकावून लावल्या. याशिवाय सुरुवातीच्या काळात अनेक दिग्गजांनी मला कॉम्प्रोमाईज करायला सांगितलं. अनेक मोठ्या दिग्गजांना मी ते करण्यासाठी नकार दिला. कारण मला या सगळ्यापासून लांब रहायचं होतं.”

 “बॉलिवूडमध्ये भूमिकेची गरज असली तरीही न्यूड सीन, सेक्स सीन देण्यासाठी मी कम्फर्टेबल नाही. त्यामुळे अशा कोणत्याही ऑफर्स स्विकारत नाही. असे अनेक मोठे प्रोजेक्ट मी सोडले आहेत. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे काम करण्यापेक्षा थोडक्या आणि चांगल्या ऑफर्स स्विकारण्याकला मी प्राधान्य देते असे तिने सांगितले होते.

नर्गिसनं नुकताच सोशल मीडियावर एका पोस्टमधून तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला होता.यासोबतचं एक पब्लिक फिगर म्हणून जगणं किती कठीण हे सांगत तिचा फॅट टू फिट असा प्रवास तिनं शेअर केला होता.

टॅग्स :नर्गिस फाकरी