Join us  

आज मला दु:ख होतं..., उदय चोप्रासोबतच्या नात्यावर नर्गिस फाखरीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 6:02 PM

2014 मध्ये उदय व नर्गिस यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अर्थात त्यावेळी दोघांनीही या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण आता...

ठळक मुद्देनर्गिसनं 2011 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकस्टार हा तिचा पहिला सिनेमा होता.

उदय चोप्रासोबत (Uday Chopra) झालेलं ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नरगिस फखरी ((Nargis Fakhri) )अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्यांची काही वर्षांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. अर्थात नर्गिसने  या बातम्या निव्वळ बकवास असल्याचं स्पष्ट केलं होतं. उदयने तर यावर एक ऑफिशिअल स्टेटमेंट जारी केलं होतं.  नर्गिस व मी केवळ मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाला रिलेशनशिपचं नाव देऊन मोकळा झालाय. पण यात काहीही सत्य नाही, असं त्यानं म्हटलं होतं.  2016 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यानंतर  उदय व नर्गिस कधीच एकत्र दिसले नाही.  सुमारे वर्षभरानंतर पुन्हा हे दोघे पहिल्यांदा एकत्र विमानतळावर दिसले होते. अर्थात तेवढ्यापुरतेच. दोघंही रिलेशनशिपवर कधीच बोलले नाहीत. मात्र आता पहिल्यांदाच नर्गिस उदयसोबतच्या नात्यावर बोलली आहे. होय, मी 5 वर्षे उदयसोबत रिलेशनशिपमध्ये होती, असा खुलासा तिने केला आहे. मग हे नातं का लपवलं? याचा खुलासाही तिने केला आहे.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा नर्गिस बोलली. ती म्हणाली, ‘मी 5 वर्ष उदयसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तो मला भारतात भेटलेला सर्वांत चांगला पुरुष होता. मी कधीच त्याच्या व माझ्या नात्याची कबुली दिली नाही. कारण अनेकांनी मला या नात्याबद्दल लपवण्याचा सल्ला दिला गेला होता. पण आज मला याचं दु:ख होतं. मी अगदी डोंगराच्या माथ्यावर जाऊन त्याच्याबद्दल जगाला सांगायला हवं होतं. मी एका सुंदर मनाच्या व्यक्तिसोबत नात्यात आहे, हे मी ओरडून ओरडून सांगायला हवं होतं. इंटरनेट व सोशल मीडिया खूप फेक आहे आणि सत्य काय आहे, हे इथल्या लोकांना कधीच कळू शकत नाही. अनेकदा आपण अशा लोकांना डोक्यावर घेतो, ख-या आयुष्यात अतिशय वाईट असतात.’

2014 मध्ये उदय व नर्गिस यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अर्थात त्यावेळी दोघांनीही या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. नर्गिसनं 2011 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकस्टार हा तिचा पहिला सिनेमा होता. यानंतर मद्रास कॅफे, फटा पोस्टर निकला हिरो, मैं तेरा हिरो, किक, अजहर, हाऊसफुल 3, ढिशुम, बँजो अशा अनेक सिनेमांत ती झळकली.

टॅग्स :नर्गिस फाकरीउदय चोप्रा