प्राजक्ता चिटणीस, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - नांदा सौख्यभरे या मालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील नील, स्वानंदी, वच्छी आत्या या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या.
टीआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका कित्येक महिने पहिल्या क्रमांकावर होती. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एका गोड वळणावर या मालिकेचा शेवट होणार असून या महिन्याच्या अखेरीस मालिका संपणार आहे.
या मालिकेत चिन्मय उद्गिरकर, रुतुजा बागवे, सुहास परांजपे, वर्षा दंडाले यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.