नणंद-भावजय यांच फारस पटत नाही, असं सर्रास बोललं जातं. काहीअंशी ते खरंही असतं. तर, काही नणंद-भावजय अगदी मैत्रिणींसारख्यासुद्धा राहतात. अशीच नणंद-भावजयीची जोडी मराठी इंडस्ट्रीतही आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा यासारख्या दर्जेदार मराठी चित्रपटातूंन रसिकांवर छाप पाडणारी सोनाली कुलकर्णी आणि तितच्याच ताकदीच्या सशक्त भूमिका पडद्यावर रंगविणारी अमृता सुभाष या दोघी नणंद-भावजय आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक सेल्फी अपलोड केला असून सोनाली म्हणतेय, नणंद-भावजय दोघी जणी... घरात नव्हतं दुसर कोणी... सोनालीच्या या कमेंटवरून तरी या दोघींच्या नात्यातील मैत्रीच दिसून येते. एवढंच नाही तर सोनाली अमृताला बेस्ट भटकंती पार्टनरही म्हणतेय.
नणंद-भावजय आल्या एकत्र
By admin | Updated: March 2, 2016 02:02 IST