Join us  

आईचे पिढीजात घर खरेदी करून तिला भेट देणे हीच 'माझी विश' - आमिर खान

By admin | Published: March 14, 2016 12:41 PM

वाराणसीत माझ्या आईचे पिढीजात घर आहे, ते खरेदी करून तिला भेट द्यावी, हीच माझी विश असल्याचे बर्थडे बॉय आमिर खानने नमूद केले.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - वाराणसीत माझ्या आईचे पिढीजात घर आहे, ते खरेदी करून तिला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे, असे बर्थडे बॉय (अभिनेता) आमिर खानने सांगितले. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो असलेला आमिर खान आज ५१ वा वाढदिवस साजरा करत असून त्यानिमित्त त्याने आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
तुझी बर्थडे विश काय, आजचा काय प्लॅन आहे, वाढदिवसाला काही संकल्प करतोस का? अशा अनेक प्रश्नांना आमिरने दिलखुलास उत्तरं दिली. माझ्या कुटुंबावर, आईवर माझं खूप प्रेम आहे. वाराणसीत माझ्या आईच मोठ पिढीजात घरं आहे, ते तिला भेट देता आलं तर मला खूप आनंद होईल, असे आमिरने सांगितले. ' दरवर्षी एखादी नवी गोष्ट वा कला शिकावी असा माझा संकल्प असतो आणि तो पूर्ण व्हावा यासाठी मी कसून प्रयत्न करतो' असेही आमिरने सांगितले. 
तुझा ड्रीम रोल काय असा प्रश्न विचारण्यात आला असता ' ड्रीम रोल तर बरेच आहेत, पण महाभारतातील कर्ण, कृष्ण यांच्या व्यक्तिरेखा मला खूप भावतात, प्रेरणादायी वाटतात. तशी एखादी भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल' असे आमिरने नमूद केले.