सोशल मीडियावर आजकाल अनेक मराठी स्टारही खूप अॅक्टिव्ह आहेत. मात्र टिष्ट्वटरवर सतत चिवचिवाट करण्यासाठी हवा असलेला वेळ देणारे काही अपवाद वगळता कमी आहेत. मात्र मुक्ता बर्वेने वेळ काढून चिवचिवाट करण्याचे ठरवले आहे. मुक्ता बर्वेने यासाठी जागतिक रंगभूमी दिनाचा मुहूर्त गाठला आणि छापा-काटाचे काही फोटोजही शेअर केले. आपण सध्या किती बिझी आहोत हे सांगण्यात ती बिझी असून तिचा अखंड चिवचिवाट सुरू झाला आहे.