Join us  

स्त्रीप्रधान चित्रपट जास्त बनावेत -विद्या बालन

By admin | Published: January 01, 2015 2:06 AM

हिंदी चित्रपटांमध्ये निसर्गाप्रमाणेच बदलाची प्रक्रिया घडत आहे आणि ती निरंतर चालत आलेली आहे. इंडस्ट्रीत दरवर्षी अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते.

हिंदी चित्रपटांमध्ये निसर्गाप्रमाणेच बदलाची प्रक्रिया घडत आहे आणि ती निरंतर चालत आलेली आहे. इंडस्ट्रीत दरवर्षी अनेक चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यात जुन्या कलाकारांसोबत काही नवीन चेहरेही समोर येतात. त्याचप्रमाणे प्रतिथयश दिग्दर्शकांबरोबरीनेच नवोदित दिग्दर्शकही त्यांची कला दाखवतात. अशा नवोदितांचे काही चित्रपटही उल्लेखनीय कामगिरी करीत बॉक्स आॅफीसबरोबरच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरून आपला ठसा उमटवतात. २०१४ सालाबद्दलच सांगायचे झाले, तर या वर्षी अनेक मोठे बदल घडल्याचे पाहायला मिळाले. काही चित्रपटांना मिळालेल्या अनपेक्षित यशाने भल्याभल्यांना आश्चर्य वाटले. सगळ््यात आनंदाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनीही अशा वेगळ््या धाटणीच्या चित्रपटांचा मोकळेपणे स्वीकार केला. या एक-दोन वर्षाच्या कालावधीत प्रेक्षकांच्या आवडीतही खूप मोठा फरक पडत असल्याचे पाहायला मिळाले. त्याची विविध कारणे आहेत. मात्र अशा नव्या पठडीतल्या चित्रपटांना चांगल्या संधी आजच्या तरुणाईमुळे उपलब्ध झाल्या आहेत. 1असे चित्रपट बनवणे हे पूर्वी फार जोखमीचे होते़ अशा चित्रपटांना आज मात्र तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी स्त्रीप्रधान भूमिका असलेल्या चित्रपटांनाही एक नवा मार्ग मिळाला आहे. कंगनाचा ‘क्वीन’ असो वा प्रियंका चोप्राचा ‘मेरी कोम’, अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशा धाटणीचे चित्रपट बनवण्याची इच्छा असलेल्या दिग्दर्शकांना आता असे चित्रपट बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे स्त्रीप्रधान चित्रपट प्रेक्षकांकडून स्वीकारले जाणार नाहीत, असे आधी वाटत होते. 2मी याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानीन; कारण त्यानी दिग्दर्शकांना नवी स्फूर्ती दिली आहे. ‘क्वीन’ आणि ‘मेरी कोम’ चित्रपटांशिवाय इतर स्त्रीप्रधान चित्रपटांतही महिलांच्या भूमिकेला प्रभावशाली दाखवल्याने त्या प्रेक्षकांना आवडल्या. हीच खरी बदलाची नांदी असल्याचे म्हणता येईल. जेव्हा अशाप्रकारच्या चित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा माझ्याही काही चित्रपटांचे नाव घेतले जाते, याचा मला आनंद होतो. 3चित्रपटसृष्टीची एक भाग असल्याने साहजिकच नव्या वर्षात आणखी वेगळ््या प्रकारचे चित्रपट बनतील, अशी अपेक्षा आहे. पण त्याचबरोबरीने स्त्रीप्रधान भूमिकांनाही योग्य वाव मिळेल, असे वाटते. कारण आता प्रेक्षकही अशा चित्रपटांचा मोकळेपणाने स्वीकार करीत आहेत. पण त्यांना या चित्रपटातून एक मनोरंजन करणारी परिपूर्ण कथाही हवी आहे, याचाही दिग्दर्शकांनी विचार केला पाहिजे. अशा प्रकारचे चित्रपट पुढच्या वर्षी जास्तीत जास्त बनतील आणि प्रेक्षकांनाही ते आवडतील, अशी आशा करायला हरकत नाही.