Join us

मोदी, शरीफ यांनीही पाहावा ‘बजरंगी भाईजान’ - सलमान

By admin | Updated: July 18, 2015 04:47 IST

सलमानसोबतच तरुणाई ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होती असा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला. सुपरस्टार सलमान खान याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी समकक्ष

सलमानसोबतच तरुणाई ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होती असा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला. सुपरस्टार सलमान खान याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी समकक्ष नवाज शरीफ या दोघांनाही ‘बजरंगी’ पाहण्याची विनंती केली आहे. त्याने टिष्ट्वट करून ही इच्छा व्यक्त केली आहे. हा चित्रपट भारत-पाक विषयावर आधारित आहे. चित्रपटात सलमानने पवन कुमारची भूमिका केली आहे, जो बजरंग बलीचा भक्त असतो. ट्विटरवर तो म्हणतो की, जर भारत-पाकच्या नेत्यांनी बजरंगी भाईजान पाहिला तर प्रेम आणि आदरपूर्वक बातचीत होईल. लहान मुलांसाठीच्या प्रेमाला कोणतीही सीमा असू शकत नाही. मोदींनी जेव्हा प्रधानमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा सलमान समारंभात सहभागी होण्यासाठी तेथे आला होता. सलमानने मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे समर्थनही केले होते.