Join us  

Mirzapur 3: 'मिर्झापूर ३' संदर्भात मोठी अपडेट, सीरिज या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 6:35 PM

Mirzapur 3: मिर्झापूर आणि मिर्झापूर २ या वेबसीरिजनंतर मिर्झापूर ३ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. मिर्झापूर सीझन ३ बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. पण आता मिर्झापूर ३ संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

मिर्झापूर (Mirzapur) आणि मिर्झापूर २ या वेबसीरिजनंतर मिर्झापूर ३ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. मिर्झापूर सीझन ३ बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. पण आता मिर्झापूर ३ संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. हे कळल्यानंतर वेब सीरिजची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता दुप्पट होऊ शकते. मिर्झापूर २ मध्ये कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून वेब सीरिजचे प्रेक्षक मिर्झापूर ३ ची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनबाबत बातमी आहे की, कालिन भैय्याचा मुलगा यात पुन्हा एंट्री करणार आहे.

याशिवाय मिर्झापूर ३ कधी प्रदर्शित होणार याबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मिर्झापूर ३ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होऊ शकतो. तथापि, मिर्झापूर ३ च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मिर्झापूर सीझन ३ पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा अखंडानंद त्रिपाठी उर्फ ​​कालिन भैयाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जगभरातून 'मिर्झापूर'ला मिळाला चांगला प्रतिसाद

अली फजल पुन्हा गुड्डू पंडितच्या भूमिकेत परतणार आहे, जो पुन्हा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे दिव्येंदू देखील फुलचंद उर्फ ​​मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत मिर्झापूर ३ मध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. तर रसिका दुग्गल बीना त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी शर्मा गजगामिनी उर्फ ​​गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. मिर्झापूर आणि मिर्झापूर २ अशा वेब सीरिज आहेत ज्यांना जगभरात खूप पसंती मिळाली आहे.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज