Join us

मन शुद्ध तुझं गोष्ट आहे... गाणं नव्या स्वरूपात

By admin | Updated: August 10, 2015 02:11 IST

१९३७मध्ये ‘कुंकू’ चित्रपटातले ‘मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची’ हे गाणं आठवतंय... शांताराम आठवले यांच्या लेखणीतून अजरामर झालेले हे गीत आजही रसिकांच्या ओठांवर रुंजी घालते

१९३७मध्ये ‘कुंकू’ चित्रपटातले ‘मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची’ हे गाणं आठवतंय... शांताराम आठवले यांच्या लेखणीतून अजरामर झालेले हे गीत आजही रसिकांच्या ओठांवर रुंजी घालते, इतकी या गाण्याची भुरळ आजही रसिकांच्या मनावर आहे. हेच जुन्या स्वरूपातलं गीत आता नवीन दमात रसिकांसमोर येत आहे. ‘डबल सीट’ या आगामी चित्रपटात हे गाणे झळकणार आहे. आजवर जुन्या पिढीतील लोकांना आवडणारं हे गीत नवीन पिढीलाही नक्की आवडेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे. चित्रपटाला हृषीकेश दातार, जसराज जोशी आणि सौरभ भालेराव या तीन संगीतकारांचं संगीत आहे. अजय गोगावले, प्रियांका बर्वे, दीपिका जोग-दातार या तिघांनी हे गीत गायलं आहे. मुंबईतील धकाधकीच्या जीवनातही आपला आनंद शोधणारे मुंबईकरांचे आयुष्य मांडण्याचा प्रयत्न मुक्ता आणि अंकुश करताना दिसणार आहेत. जुनी मुंबई, इथली धावपळ, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड या गाण्यात दाखवण्यात आली आहे.