Join us

मिका सिंहची अभिनयात एंट्री

By admin | Updated: July 16, 2014 13:20 IST

प्रसिद्ध गायक मीका सिंहने आजवर ५० हून जास्त हिट साँग्स गायले आहेत. आता तो अभिनयात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

प्रसिद्ध गायक मीका सिंहने आजवर ५० हून जास्त हिट साँग्स गायले आहेत. आता तो अभिनयात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. बलविंदर सिंह ‘फेमस हो गया’ या चित्रपटातून मीका अभिनयात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनील अग्निहोत्री, वंदना जैन आणि मीका सिंह करणार आहे. हा चित्रपट एक म्युझिकल कॉमेडी असून तो १९ सप्टेंबरला रिलीज होत आहे. गायक शान आणि मीकासह चित्रपटात अनुपम खेर, राजपाल यादव आणि असरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात गॅब्रिएला ब्रेटँट ही परदेशी अभिनेत्री दिसणार आहे. या चित्रपटाची कथा मीका आणि शान यांच्यावर आधारित आहे, दोघांचेही चित्रपटातील नाव बलविंदर सिंह आहे, दोघेही त्यांच्या स्वप्नातील राणीला जिंकण्याचा प्रयत्न करतात.