Join us  

'यंटम' चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे संपन्न !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 10:38 AM

समीर आशा पाटील दिग्दर्शित यंटम या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच जुन्नर येथे संपन्न झाला. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनेते ...

समीर आशा पाटील दिग्दर्शित यंटम या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच जुन्नर येथे संपन्न झाला. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनेते सयाजी शिंदे आणि भाऊ कदम महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना या चित्रपटात ९२ नवोदित कलाकारदेखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे हे वैशिष्टय असणार आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक समीर आशा पाटील सांगतात, 'यंटम'सारखा चित्रपट करणं माज्यासाठी आव्हान आहे.  आम्ही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच सर्वोत्तम कलाकार-तंत्रज्ञांना घेऊन मला हा चित्रपट करायचा होता ती ही इच्छा या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. यंटम हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. ही एक म्युझिकल फिल्म आहे. यंटमच्या रूपाने  मनातली एक गोष्ट आज मोठया पडद्यावर साकारायला सज्ज झाली असून यासाठी निमार्ते अमोल काळे यांनी जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. शार्दूल फिल्म्सचे अमोल काळे यांनी  या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच यांनी यापूर्वी दगडी चाळ या चित्रपटाचीदेखील निर्मिती केली होती. त्याचबरोबर दिग्दर्शक समीरसह मेहुल अघजा यांनी यंटम या चित्रपटाचं लेखन केलं आहे. डबलसीट, राजवाडे अँड सन्स या चित्रपटातील अर्जुन सोरटे यांनी सिनेमॅटोग्राफरची जबाबदारी पार पाडली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश कामदार यांनी संकलन केले आहे.  कुणाल लोलसूर  यांनी  साऊंड आणि डिझाईन केली असून मीलन देसाई यांनी वेशभूषाची जबाबदारी पार पाडली आहे.  'यंटम'चे चित्रिकरणा जुन्नर परिसरात  चित्रीकरण सुरु आहे. यापूर्वी दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी 'चौर्य' हा चित्रपट केला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.