Join us

केतकीला काम करायचं इरफान खानसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:02 IST

अभिनेत्री ही बॉलीवुड असो या मराठी या दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्रीला काम करायचे असते बॉलीवुड खानस सोबत पण आपली ...

अभिनेत्री ही बॉलीवुड असो या मराठी या दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्रीला काम करायचे असते बॉलीवुड खानस सोबत पण आपली मराठमोळी तरूणांची धडकन असणारी प्राजू म्हणजेच केतकी माटेगावकर हिला अभिनेता इरफानसोबत बॉलीवुडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे केतकी माटेगाावकरने लोकमत सीएनएक्सजवळ व्यक्त केली. केतकी म्हणाली,इरफान खान हा माझा फेव्हरेट अ‍ॅक्टर आहे. त्यांनी तलवार, पिंकू या चित्रपटात अप्रतिम अ‍ॅक्टिंग केली आहे. मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या अभिनयाचे निरीक्षण करून अजून अभिनय शिकायचं आहे. ते अगदी कोणत्याही भूमिकेत राहून सहज अ‍ॅक्टिंग करतात. त्यांची हीच कला मला फार भावते. तसेच केतकी काही दिवसात अभिनेता अरविंद स्वामी यांच्यासोबत बॉलीवुडमध्ये पदापर्ण करत आहे.