Join us  

​सोनाली कुलकर्णी का आहे प्रचंड खूश?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 7:42 AM

सोनाली कुलकर्णी सध्या प्रचंड खूश आहे आणि ती आनंदित असण्यामागे एक खास कारण आहे. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या ...

सोनाली कुलकर्णी सध्या प्रचंड खूश आहे आणि ती आनंदित असण्यामागे एक खास कारण आहे. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर तर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे, या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. ती तिच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशनही अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून करते. त्यामुळे तिचे फॅन्स आवर्जून तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. सोनालीचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाइड असून तिला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटमुळेच ती सध्या प्रचंड खूश आहे. कारण ट्विटवरवर तिच्या फॉलोव्हर्सची संख्या आता एक लाख तेहतीस हजाराहून अधिक झाली आहे. तिच्या ट्विटर फॉलोव्हर्सचा आकडा लाखाहून अधिक झाल्याचा आनंद तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तिने ट्विटरवर तिचा एक खूप छानसा फोटो पोस्ट करून आईला इट्स १०० के असे लिहिले आहे.सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. तिच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचा हम्पी हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील सोनालीच्या लूकची आणि अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. Also Read : म्हणून सोनाली कुलकर्णीने धारण केली शेरॉन स्टोनची हेअरस्टाईल