VIDEO : जेव्हा भाऊ लग्नासाठी सईला करतो प्रपोज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 15:19 IST
सई ताम्हणकर, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या मराठी तारकाला कोण नाही ओळखणार.
VIDEO : जेव्हा भाऊ लग्नासाठी सईला करतो प्रपोज !
सई ताम्हणकर, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या मराठी तारकाला कोण नाही ओळखणार. तिच्याशी लग्न करणे म्हणजे एखाद्यासाठी एक दिव्यस्वप्नच असेल. असेच स्वप्न पाहिले भाऊ कदमने आणि सरळ प्रेक्षकांमध्येच सईला लग्नासाठी प्रपोज केले. प्रसंग होता, ‘वायझेड’ चित्रपटाच्या प्रमोशनचा. प्रमोशनच्या निमित्ताने अनेक चित्रपटांचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत असतात. या आठवड्यात वायझेड या चित्रपटातील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सईला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर पुढे काय घडले ते पाहा.... video source : z 24 taas