Join us  

घर बसल्या पाहता येणार 'वाळवी' चित्रपट; OTTवर या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 6:10 PM

Vaalvi Movie : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वाळवी नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे.

स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर आणि शिवानी सुर्वे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट वाळवी (Vaalvi Movie) नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. सध्या वाळवीची चर्चा पहायाला मिळत आहे. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी पासून झी ५वर पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांची निर्मिती असलेली वाळवी ही फिल्म तिकीट खिडकीवर यशस्वी ठरली आहे. अवनी (अनिता दाते-केळकर) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) हे दोघे एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात अशा दृश्यापासून फिल्म सुरू होते. आर्थिक समस्यांहून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आणि त्यांच्यासमोर आत्महत्या  हाच सर्वोत्तम उपाय आहे असे त्यांना ठामपणे वाटत असते. मात्र, प्रत्यक्षात ही आत्महत्या नसून खुनाचा प्रयत्न आहे आणि त्याचे सूत्रधार अनिकेत व त्याची प्रेयसी देविका (शिवानी सुर्वे) आहेत हे नंतर समोर येते. अनिकेतच्या कटकट्या बायकोपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे कारस्थान रचलेले असते. शिवाय आणखी एक गूढ मनुष्य (सुबोध भावे) काहीतरी छुपा हेतू घेऊन असतो. आता कटाच्या मुख्य दिवशी नेमके काय घडते हेच या चित्रपटात दाखवले आहे. 

अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, वाळवीतील भूमिका माझ्यासाठी प्रायोगिक स्वरूपाची होती. मी या प्रकारची भूमिका पूर्वी केलेली नव्हती आणि तिला जो प्रतिसाद मिळाला त्याचा मला खरोखरच आनंद वाटतो. माझ्या दिग्दर्शकाने (परेशम) मला अभिनेता म्हणून माझ्या कक्षा रुंदावण्यात मदत केली. त्याने मला माझ्या ‘कंफर्ट झोन’बाहेर ओढले, याबद्दल मी कृतज्ञ आहे. या फिल्मची प्रशंसा केल्याबद्दल आणि फिल्मवर प्रेम केल्याबद्दल मी प्रेक्षकांचाही ऋणी आहे. आता वाळवीचा जागतिक डिजिटल प्रीमियर झी ५ वर होत असल्यामुळे जगभरातील व्यापक प्रेक्षकवर्गापुढे फिल्म पोहोचणार आहे. ही एक उत्तम लिहिलेली, धक्के देणारी ब्लॅक कॉमेडी आहे तसेच प्रेमातून घडणाऱ्या गुन्ह्यांकडे यात उपहासगर्भ दृष्टिकोनातून बघितले आहे. त्यामुळे लोकांनी या फिल्मकडे नमुना म्हणून बघावे असे मी म्हणेन.
टॅग्स :स्वप्निल जोशीअनिता दातेशिवानी सुर्वेसुबोध भावे