Join us

​उमेशने या गाण्यावर पहिल्यांदा केले नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 14:03 IST

उमेश जाधव आज मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा कोरिओग्राफर आहे. तो त्याच्या तालावर अनेक अभिनेता, अभिनेत्रींना नाचवत असतो. दुनियादारी, आयना का ...

उमेश जाधव आज मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा कोरिओग्राफर आहे. तो त्याच्या तालावर अनेक अभिनेता, अभिनेत्रींना नाचवत असतो. दुनियादारी, आयना का बायना, प्यार वाली लव्ह स्टोरी, यांसारख्या चित्रपटातील त्याच्या कोरिओग्राफीचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. सरफरोश, ट्रॅफिक सिग्नल, सिलसिला है प्यार का यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्याने साहाय्यक कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी उमेशने कोरिओग्राफी केलेली असली तरी त्याला अद्याप अमिताभ बच्चन आणि माधुरी दिक्षित यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली नाही. उमेश अमिताभ बच्चन आणि माधुरी दिक्षित यांचा जबरा फॅन आहे. माधुरी ही खूपच चांगली नर्तिका असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तिच्या सौंदर्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असेही तो सांगतो. एका मराठी मुलीनी केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपले एक स्थान निर्माण केले आहे याचा उमेशला अभिमान आहे. अमिताभ यांच्या नृत्याच्या प्रेमात तर तो लहानपणापासून आहे. अमिताभ यांच्या खइके पान बनारसवाला या गाण्यावर आरशासमोर तो लहानपणी नृत्य करत असे. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा याच गाण्यावर थिरकलो होतो असे तो सांगतो. अमिताभ यांचे नृत्य पाहूनच मी नृत्य शिकलो असेही तो सांगतो.