Join us  

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस,डॉक्टर ह्यांना मराठी स्टार्सचा व्हिडिओ द्वारे मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:15 PM

सिद्धार्थ जाधव, गश्मीर महाजनी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी,सुबोध भावे, रिंकु राजगुरू यासोबत अनेक कलाकर या व्हिडीओद्वारे जनजागृती करत आहेत.

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या उद्रेकामुळे सध्या संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाने संपूर्ण जग हैराण झाले आहे. याकाळात सर्वजण आपापल्या परीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. यातच मराठी कलाकारांनी एक आशेचा किरण दाखवला आहे. समीर विध्ंवस आणि हेमंत ढोमे यांनी पुढाकार घेत कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस , डॉक्टर , यांना तू चाल रं गड्या तुला भीती कशाची म्हणत मराठी स्टार्सचा व्हिडिओद्वारे  मानाचा मुजरा दिला आहे. तसेच या माध्यमातून लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा मान राखून तरी सर्वांनी घरात बसून स्वतःचं व देशाचं रक्षण करावं असं आवाहन या व्हिडिओमधून करण्यात आले आहे.

सिद्धार्थ जाधव, गश्मीर महाजनी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी,सुबोध भावे, रिंकु राजगुरू यासोबत अनेक कलाकर या व्हिडीओद्वारे जनजागृती करत आहेत. विशेष म्हणजे या  व्हिडीओचे शूटिंग सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहून केली आहे.  तसेच जे  दिवसरात्र बाहेर राहून देशसेवा करत आहेत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे  हे या व्हिडीओचे मुख्य उद्दीष्ट आहे.  घरी रहा, बाहेर जाऊ नका. तरच तुम्ही या भयानक कोरोना आजारापासून सुरक्षित राहाल. असाही संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

तसेच सध्या अनेक कलाकर घरातच बसून वेगवेगळ्या गोष्टी करत रसिकांसह संवाद साधत आहेत. त्यांचे करमणूक करताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन असले म्हणून काय झाले घरात बसून कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याटे पाहायला मिळत आहेत. यामुळेच अनेक कलाकारांच्या अंगी असलेल्या कलाही त्यांच्या चाहत्यांना समजत आहेत. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी करत कलाकार रमताना दिसत आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस