Join us  

हा चिमुकला करतोय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, ओळखा कोण आहे हा अभिनेता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:37 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्याने त्याच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत हा कलाकार खूपच छान दिसत आहे.

हा फोटो पाहून हा कोण कलाकार आहे याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागलेली असणार... हा मुलगा सध्या मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करत असून एकाहून एक हिट चित्रपट देत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून त्याला ओळखले जाते. हे सगळे वाचल्यावर हा अभिनेता कोण आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल... हा अभिनेता स्वप्निल जोशी असून या फोटोत तो खूपच छान दिसत आहे.स्वप्निल जोशीच्या लहानपणीचा एक फोटो त्याने नुकताच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केला आहे. या फोटोत चिमुकला स्वप्निल त्याच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. सुट, कानटोपी, हँड ग्लोव्हज घातलेला स्वप्निल खूपच क्यूट दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून तो एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला होता, तेव्हा हा फोटो काढला असल्याचे कळत आहे. स्वप्निलने हा फोटो पोस्ट केल्यापासून त्याच्या चाहत्यांनी या फोटोला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा फोटो हजारोंहून अधिक लोकांनी लाइक केला असून अनेकांनी त्यावर कमेंट दिल्या आहेत. तू लहानपणापासूनच छान दिसतोस असे अनेकांचे म्हणणे आहे. या फोटोसोबत चाइल्हहूडस आर द बेस्ट म्हणजेच बालपण हे सगळ्यात चांगले असे स्वप्निलने लिहिले आहे. स्वप्नीलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून त्याने आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्नीलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्याने मराठीत मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्समोअर, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा, तु ही रे, दुनियादारी, रणांगण, भिकारी यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशी