Join us

तेजश्रीचा लॉस एंजिलीसमध्ये हॉलिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:49 IST

             मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यामातून आज प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेली अभिनेत्री ...

 
            मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यामातून आज प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या लॉस एंजिलीसमध्ये हॉलिडे एंजॉय करीत आहे. तेजश्री नूकतीच कार्टी काळजात घसुली या नाटकाच्या प्रयोगासाठी एलए ला गेली होती. अभिनेते प्रशांत दामले आणि तेजश्रीच्या या नाटकाला एलए मधील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर या नाटकाचा शो देखील तिथे हाऊसफुल्ल झाला होता. याबद्दल आनंद व्यक्त करताना तेजश्री आणि प्रशांत दामले यांनी हातात हाऊसफुल्लचा बोर्ड घेऊन काढलेला फोटो टविटरवर अपलोड केला आहे. हा प्रयोग खास एलए मधील महाराष्ट्र मंडळातील प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. नाटकाच्या प्रयोगातून वेळ काढून तेजश्रीने यावेळी एलए फिरण्याचा देखील आनंद लुटला. तिने हॉलिडेचे अतिशय सुंदर फोटो नूकतेच सोशल साईट्सवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजश्री एकदम झक्कास दिसत आहे.