तेजश्रीला घ्यायचय समुद्रकिनारी घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:30 IST
निळेशार पाणी..अथांग समुद्रकिनारा.. वाºयाची झुळूक... नारळाची झाडे... अशा निसर्गरम्य वातावरणात ...
तेजश्रीला घ्यायचय समुद्रकिनारी घर
निळेशार पाणी..अथांग समुद्रकिनारा.. वाºयाची झुळूक... नारळाची झाडे... अशा निसर्गरम्य वातावरणात राहण्याची इच्छा झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा समुद्रकिनारा काहीही हा श्री, असे म्हणणाºया तेजश्री प्रधानला देखील आवडतो. अहो, एवढेच नाही तर तेजश्रीला समुद्रकिनारी घर देखील घ्यायचे आहे. हेच सुंदर स्वप्न तेजश्रीने सीएनएक्सला सांगितले आहे. तेजश्री म्हणते, मला लहानपणा पासूनच समुद्राचे फार आकर्षण आहे. मला जेव्हा वेळ मिळतो किंवा मी सुट्टी घेते तेव्हा मस्त समुद्रकिनारी जाऊन मजा करते. समुद्रकिनाºयाच्या शांत वातावरणात मला तासनतास बसायला आवडते. लाटांचा आवाज ऐकायला तर मला मस्तच वाटते. सुर्यास्ताच्यावेळी अथांग समुद्रामध्ये विलिन होणारा सुर्याचा गोळा पाहण्याचा अनूभवच वेगळा असतो. समुद्रकिनाºयाविषयी एवढे प्रेम आणि मुंबईत राहत असल्याने समुद्राशी असलेले जवळचे नाते यामुळे आपलेही समुद्रकिनाºयावर घर असावे असे माझे स्वप्न आहे. खरतर मला हे स्वप्न स्वप्नच ठेवायला जास्त आवडेल. हे स्वप्न सत्यात उतरवायचे म्हणजे एकच मार्ग. प्रामाणिकपणे जास्तीत जास्त काम करत राहणे. आणि बाप्पाची इच्छा असेल तर नक्कीच हे स्वप्न लवकरच पुर्ण होईल. मालिका, चित्रपट, नाटक आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण हा चढता आलेख पाहता तेजश्रीचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असेच दिसतेय.