Join us  

निवडणुकीत राजकीय पक्षाचा प्रचार करणार का? काय म्हणाला स्वप्नील जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:33 PM

मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट हिरो' असं स्वप्नील जोशीला म्हटलं जातं.

देशातील निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वत्र राजकारणाच्या चर्चा रंगल्या आहे. राजकारणाने अनेक कलाकारांना आकर्षित केलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहे. बॉलिवूड सेलिब्रेटीप्रमाणेच मराठी कलाकारांनी राजकारणात रस आहे. कोणी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. आपल्या प्रसिद्धीच्या वलयामुळे अभिनेते निवडूनही येतात. तर कोणी आपल्या आवडत्या पक्षाासाठी काम करत आहे. यातच अभिनेता स्वप्नील जोशीनं राजकीय पक्षांसाठी प्रचार करण्यावर आपलं मत व्यक्त केल. 

मराठी मनोरंजनसृष्टीतील 'चॉकलेट हिरो' असं स्वप्नील जोशीला म्हटलं जातं. नुकतेत त्यानंं महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी त्याला 'राजकीय पक्षाचा प्रचार करणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'सर्वच राजकीय पक्षात माझे मित्र आहेत. पण मी कुणासाठीही प्रचार करीत नाही. एकासाठी केला तर मग दुसऱ्यासाठी का नाही करायचा, याचं माझ्याकडे कारण नाही. व्यावसायिक भाषेत त्याला "सुपारी' म्हणतो, म्हणजे पैसे घेऊन विशिष्ट ठिकाणी जाणं मी करत नाही'. 

पुढे तो म्हणाला, 'मी अनेक सामाजिक किंवा सरकारच्या उपक्रमांमध्ये मी स्वेच्छेनं सहभागी होतो. तेव्हा मी कधीच पैसे घेत नाही. कलाकार म्हणून ती माझी जबाबदारी आहे. जोपर्यंत मी मानधन मागत नाही. तोपर्यंत त्याला नाही म्हणणं माझ्या हातात आहे. जेव्हा मी पैसा घेईल तेव्हा ते मला करणं भाग आहे. प्रचार मी करत नाही.  मला असं वाटतं की प्रचार करणं-न करणं हे अत्यंत वैयक्तिक आहे. शेवटी मी नागरिक आहे. माझी काही मतं आहेत. जर माझं मत  A आहे. तर मग पैसे घेऊन B चा प्रचार करणं मला पटणार नाही आणि A चा प्रचार करण्यासाठी पैसे का घेऊ, कारणं माझं मतचं ते आहे'. 

स्वप्नील म्हणाला, 'प्रत्येकाची जबाबदारी आहे मतदान करणं. यानिमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो, की आपल्या देशाचा सर्वोच्च उत्सव आपण साजरा करणार असल्यानं सर्वांनी न चुकता मतदान करावं. आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तो आपला फक्त हक्क नाही. ती एक जबाबदारी आहे. कुठल्याही पक्षाला करा, आवडत्या उमेदवाराला करा. पण मतदान करा', असं आवाहन त्यानं केलं. 

टॅग्स :स्वप्निल जोशीसेलिब्रिटीमराठी अभिनेताराजकारण