Join us  

मराठी इंडस्ट्रीतही नेपोटिझम आहे का? सुनील तावडेंचा लेक स्पष्टच म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 5:58 PM

अभिनेता शुभंकर तावडेने नेपोटिझमवर लोकमत फिल्मीशी बोलताना त्याचं स्पष्ट मत सांगितलंय

बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर अनेक चर्चा आणि वादविवाद दिसतात. अनेक स्टारकिड्सवर नेपोटिझमचा शिक्का बसल्याने चर्चांना तोंड फुटलं. स्टारकिड्सनेही नेपोटिझमवर त्यांचं स्पष्ट मत मांडलंय. अशातच मराठी मनोरंजन विश्वात सुद्धा नेपोटिझम आहे का? या प्रश्नावर अभिनेते सुनील तावडेंचा लेक शुभंकर तावडेने  लोकमत फिल्मीशी संवाद साधताना त्याचं स्पष्ट मत मांडलंय.

शुभंकर तावडे म्हणाला,"मला नाही वाटत. कारण माझ्या वडिलांनाही आता कामासाठी फोन करावे लागतात. ही खूप कॉमेडी गोष्ट आहे की, इतर लोकांना वाटत असतं की नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी. मी जर निर्माता झालो तर हृताच्या मुलीला किंवा मुलाला मी संधी देईल. कारण हृता ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. किंवा हृताही असं करू शकेल. फक्त मनोरंजन विश्व कुठेतरी जास्त लोकांसमोर येतं म्हणून हे खूप दिसतं.  डॉक्टर्स असुदे किंवा स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या फॅमिली असो किंवा किराणा माल सांभाळणारे दुकानदार असो, ही सर्व माणसं त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्याचं गोष्टी करायला लावतात. मला असं वाटतं की फक्त क्रिकेट, स्पोर्ट्स ही क्षेत्र लोकांच्या ठळकपणे समोर आहेत. त्यामुळे तुम्ही थेट त्यावर बोट ठेवू शकता."

शुभंकर पुढे म्हणाला, "आता समजा, तुमचे नातेवाईक कोणी एकाच मीडिया हाऊसमध्ये काम करत असतील तर त्यांना कोणी विरोध करणार नाही. मला नाही वाटत की मराठीत नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जरी मराठीत किंवा कुठेही त्या गोष्टी असल्या तरीही त्या चुकीच्या नाहीत. लोकं ठरवतात कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही. मोठमोठे लोकं चांगले काम करणारे सुद्धा राहतात. आणि खूप लोकांनी इंडस्ट्रीत स्वतःला ग्रँड लाँच केलं असलं, पण काम चांगलं नाही केलं तर तसेच जातात." शुभंकरचा 'कन्नी' सिनेमा ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :मराठी