Join us

सुनिल पाल बनणार लेखक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:30 IST

Exculsive - बेनझीर जमादार                  प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता सुनिल पाल ...

Exculsive - बेनझीर जमादार                  प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता सुनिल पाल हा लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. सुनिलने यापूर्वीही आम्ही चार, चष्मेबहाद्दूर, फॅमिली  ४२० हे मराठी चित्रपट केले आहेत. पण हा विनोदी अभिनेता आता  थेट संवेदनशील विषयाला स्पर्श करणार आहे. कारण सुनिल हा थेट, एक संवेदनशील भूमिका साकारताना प्रेक्षकांना दिसणार आहे. एक होता लेखक असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट बाबा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण संपले असून हा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट असणार असल्याचे अभिनेता सुनिल पाल यांनी  लोकमत सीएनएक्सला सांगितले. सुनिल सांगतो, या चित्रपटात मी लेखकाची भूमिका केली आहे. हा चित्रपट लेखकाच्या जीवनावर आधारित असणार आहे. लेखकांचे जीवन व त्यांचा संघर्ष प्रेक्षकांना रूपेरी पडदयावर  पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एखादा सामाजिक विषय हाताळताना खरचं खूप छान अनुभव मिळाला. तसेच सध्या मराठी चित्रपट हे यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात काम करण्याची एक ही संधी मी सोडणार नाही. मराठी चित्रपट असो या रंगभूमी  या सर्वाचा मी अत्यंत वेडा चाहता आहे. मला अक्षरश: मराठी इंडस्ट्रीचे वेड लागले आहे असे म्हणण्यासदेखील हरकत नाही.